मंडणगड : डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी यश संदीप चाचले याने विभागस्तरीय शालेय उंच उडी क्रीडा स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले.सांगली,कोल्हापूर,सातारा,सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या विभागस्तरीय स्पर्धेत यशने १४ वर्षांखालील वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळवला.
शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच क्रीडाशिक्षक संजय अवेरे व गौतम माने यांच्या अथक परिश्रमातून यशने हे यश संपादन केले.यशच्या या शानदार कामगिरीमुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याच्या यशाबद्दल संस्थेचे,पदाधिकारी, मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक, शिक्षकवृंद,पालकवर्ग व ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या यशामुळे मंडणगड तालुक्यासह जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून,आगामी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी यशला सर्वांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
