लांजा : भरधाव वेगाने गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर ने पोलीस व्हॅन ला पाठीमागून धडक दिल्याने पोलीस व्हॅन काजळी नदीपात्रा लगत कोसळली. शनिवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर आंजणारी घाटातील तीव्र उताराच्या ठिकाणी हा अपघात घडला.या भीषण अपघातामध्ये हातखंबा वाहतूक शाखेच्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून दुसरा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. तसेच या अपघातामध्ये कंटेनर चालक आणि क्लिनर यांचा देखील मृत्यू झाला आहे.
दरम्यान आज रविवारी सकाळी दहा वाजता दोनशे फूट खोल दरीत कोसळलेली अपघातग्रस्त पोलीस व्हॅन क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली. या दुर्घटनेमध्ये हातखंबा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष आप्पासाहेब गायकवाड (वय ५१) यांचा मृत्यू झाला असून चालक अनिल अशोक शिंगाडे (वय ३५) हे गंभीर जखमी झाले. तसेच या अपघातामध्ये कंटेनर चालक मदन हेमसिंग (वय ४१, राहणार पाली जिल्हा, राजस्थान) तसेच क्लीनर त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
हातकंबा वाहतूक केंद्राचे पोलीस कॉन्स्टेबल अनिल अशोक शिंगाडे (वय ३६) हे शनिवार दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी वाहतूक मदत केंद्र हातकंबा येथे ड्युटीवर असताना तेथील ठाणे अमलदार श्री.
तळेकर यांनी शिंगाडे यांना लांजा पोलीस ठाणे येथील डायल ११२ यावर आंजणारी पुलाच्या खाली नदीपात्रात गाडी गेली असल्याचे व अपघात झाल्याचे कळवले असल्याचे सांगितले. त्यामुळे सदर ठिकाणी पाहणी करण्यासाठी अनिल शिंगाडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड यांच्यासह आंजणारी येथे हातखंबा वाहतूक शाखेच्या पोलीस व्हॅन (एम एच ०८ बीई ३६६१) ने जात असताना रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या २२ चाकी कंटेनरने (क्रमांक आर जे.०९ जीइ २३९७) पोलिसांच्या व्हॅनला पाठीमागून धडक दिल्याने पोलीस व्हॅन चेंडू काजळी नदीपात्रा लगत कोसळली.
या अपघातानंतर कंटेनर देखील रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन पलटी झाला या अपघातामध्ये कंटेनरच्या केबिनचा अक्षरशा चुराडा झाल्याने चालक केबिन खाली अडकून पडला होता. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा मृत्यू झाला तर कंटेनर चा क्लीनर चा जागीच मृत्यू झाला होता. त्याची ओळख पटलेली नाही.
अपघातानंतर दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने पाली येथील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करून त्यानंतर अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड यांचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचारी शिंगडे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघाताची माहिती मिळतात उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनी भेट देऊन पाहणी केली व पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यकता सूचना केल्या. यावेळी लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले, संजय मारळकर, यांनी शनिवारी रात्री घटनास्थळी भेट देऊन पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना केल्या
या अपघात प्रकरणी कंटेनर चालक मदन हेम सिंह याच्यावर भारतीय न्यायसहिता २०२३ चे कलम.
१०६(१), २८१, १२५, (अ), १२५(ब), मोटार वाहन कायदा कलम १८४ , भादविकलम ३०४(अ), ३३७, ३३८, २७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या अपघात प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगळे हे करत आहेत.
