
संगमेश्वर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. अशोकराव जाधव यांच्या मातोश्री श्रीमती सुलोचना वासुदेव जाधव यांचे कोसुंब (तालुका संगमेश्वर) येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८७ वर्षांच्या होत्या.
श्रीमती सुलोचना जाधव यांच्यावर जुगाई मंदिराजवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी श्री. अशोकराव जाधव यांचे सांत्वन केले. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.