नवी दिल्ली : गोकुळमध्ये दूध उत्पादकांनी भाजपचा पराभव केला. मात्र, निवडणुकीनंतर भाजपने नियम बदलून चार संचालकांची नियुक्ती केली आणि संचालकांची संख्या १२ वरून १६ केली. अशा प्रकारे बहुमताची चोरी करण्यात आली. हा दूध उत्पादकांच्या मतांची चोरी असून जनादेशात फेरफार करण्याचा प्रकार आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे केला आहे.
भाजप इतका हताश झाला आहे की, प्रत्येक ठिकाणी सत्ता टिकवण्यासाठी कोणत्याही थराला जात आहे. दूध उत्पादकांची मते चोरणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, शेतकरी कधीही विसरत नाही, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
