दापोली : दीपावली सणाचे औचित्य साधून दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. महेश धुमाळ यांनी कर्मचारी वर्गासाठी एक कौतुकास्पद उपक्रम राबविला. त्यांनी नगरपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त विशेष सदिच्छा भेट देऊन सणाच्या शुभेच्छा दिल्या.
नगरपंचायतीच्या कामकाजात सफाई कामगार, कार्यालयीन कर्मचारी आणि इतर सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असते. त्यांच्या या कष्टाची दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी प्रत्येकाशी वैयक्तिक संवाद साधला आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ‘हा छोटासा उपक्रम कर्मचाऱ्यांच्या कामाप्रती असलेल्या आदराचे प्रतीक आहे,’ असे श्री. धुमाळ यांनी यावेळी नमूद केले. या उपक्रमामुळे कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या या कृतीचे स्वागत केले आहे.