देवरुख : देशातील आघाडीच्या आणि विश्वासार्ह त्वचारोग तज्ज्ञांमध्ये समावेश असलेल्या डॉ. नेहा देवकर यांचे मुळे संगमेश्वर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील साडवली गावची सुकन्या व रत्नागिरीचे माजी जिल्हा शल्य चिकित्सक सुप्रसिद्ध अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. प्रल्हाद नारायण देवकर यांच्या सुकन्या डॉ. नेहा प्रल्हाद देवकर (M.D.) यांना जागतिक स्तरावर ख्याती असलेल्या आणि भारतातील आघाडीच्या महिला मासिकांपैकी एक असलेल्या ‘FEMINA’ (फेमिना) मासिकाच्या मुखपृष्ठावर स्थान मिळाले आहे.असा बहुमान मिळविणारी जिल्हातील पहीली महिला ठरली आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान, कौशल्य आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. देशातील अत्यंत विश्वासार्ह त्वचारोग तज्ज्ञांपैकी एक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्हात अस्थीरोग तज्ञ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केलेले डॉ. निखिल देवकर या आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी मिळवलेल्या या उल्लेखनीय यशामुळे केवळ देवकर कुटुंबीयांचाच नव्हे, तर देवरुख-साडवली गावासह संपूर्ण संगमेश्वर तालुक्याचा गौरव वाढला आहे.
ग्रामीण भागातून पुढे येत वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकण्याचा मान मिळविणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. डॉ. नेहा देवकर यांच्या या यशामुळे गावातील तरुणाईला आणि विशेषतः मुलींना प्रेरणा मिळणार आहे.
त्यांच्या या देदीप्यमान यशाबद्दल साडवली ग्रामस्थांसह संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील वैद्यकीय वाटचालीसाठी आणि उत्तरोत्तर यशासाठी सर्व स्तरांतून मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
डॉ. नेहा देवकर यांच्या यशाचा हा गौरव संगमेश्वर तालुक्याच्या शिरपेचातील मानाचा तुरा ठरला आहे!
