जेजुरी : अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या निमित्त लाखो भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. पहाटेपासूनच ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ च्या जयघोषात संपूर्ण जेजुरी नगरी दुमदुमून गेली आहे.
सोमवती अमावस्येचे औचित्य साधून गावकरी, खांदेकरी, मानकरी यांनी पारंपारिक वाद्यांच्या गजरात खंडोबा देवाची महापूजा केली. मंदिर अभिषेक, आरती करण्यात आली. यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. मोठ्या भक्तिभावाने पूजा-अर्चा केली. मंदिर परिसरात भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत..
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच कर्नाटक, आंध्रप्रदेशातूनही भाविक मोठ्या संख्येने जेजुरी गडावर दाखल झाले आहेत. गर्दीच्या पार्श्वभूमीवर जेजुरी पोलिसांकडून तसेच मंदिर संस्थानकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
