दापोली : श्री लक्ष्‍मीनारायण सेवा समिती,सडवे यांच्या विद्यमाने मौजे सडवे येथे शनिवार, दिनांक 21 नोव्हेंबर 2026 रोजी कार्त्तिकी एकादशीनिमित्त ‘श्री लक्ष्‍मीनारायण (विष्णू) मूर्ती महाअभिषेक सोहळा’अत्यंत उत्साहात व भक्तीमय वातावरणात आयोजित करण्यात आला आहे.

​या ऐतिहासिक मंदिरातील मूर्तीचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. 821 वर्षांपूर्वी सुवर्णकार कामदेवाने घडविलेल्या श्री लक्ष्‍मीनारायणाच्या (विष्णूच्या) मूर्तीची स्थापना उत्तर कोकणाचा राजा केशीर यांचा मंडलीक जैत्रसामंत यांचा प्रधान देवूशीनायक याने सोमवार, रोहिणी नक्षत्र शके 1127 (इ.स. 1205) या दिवशी केली होती. त्यामुळे या मंदिराला पुरातन विशेष महात्म्य लाभले आहे.या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मंदिरात होणाऱ्या या सोहळ्याची ग्रामस्थांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.

या निमित्ताने ​दि.21 नोव्हेंबर 2026 रोजी होणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
​सकाळी 9 वाजता मूर्तीची पूजा व अभिषेक,
​सकाळी 10 वाजता सहस्र नाम जप,
​सकाळी 11 वाजता महाआरती,
​दुपारी 12 वाजता प.पू. श्री.दत्तात्रय शंकर आदावडे (पुणे) यांचे सुश्राव्य प्रवचन,
​सायंकाकाळी 4 वाजता श्री लक्ष्‍मीनारायण सेवा समितीचे सुस्वर भजन,
​6:30 वाजता दीपोत्सव व आरती,
​सायंकाकाळी 7 वाजता तुळशी विवाह असे विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडणार आहेत.तरी या कार्यक्रमाला भक्त गणांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा तसेच
​महाप्रसादाचाही लाभ घ्यावा,असे आवाहन श्री लक्ष्‍मीनारायण सेवा समिती सडवे यांच्या वतीने करण्यात आले आहे.