चिपळूण : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना चिपळूणतर्फे आज शिवसेना संपर्क कार्यालयात आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. तसेच, यापुढे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संघटनेचे काम अधिक जोमाने करण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, तालुका समन्वयक सुधीरभाऊ शिंदे, शहरप्रमुख भैया कदम, युवासेना तालुकाधिकारी प्रीतम वंजारे, युवासेना शहराधिकारी पार्थ जागुष्टे, शहर सचिव प्रशांत मुळये, उपतालुकाप्रमुख सचिन शेट्ये, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख सचिन चोरगे, युवतीसेना तालुकाधिकारी तीर्था लाड, महिला आघाडी शहर संघटक सौ. श्रद्धा घाडगे, उपशहरप्रमुख संजय रेडीज, राजन खेडेकर, मनोज पांचाळ, विभागप्रमुख शशिकांत शिंदे, मंगेश कोकीरकर, विलास चाळके, दीपक ओकटे, बंधू कदम, संकेत शिंदे, संतोष मिरगल, महेश संसारे, समीर राऊत, उपविभागप्रमुख नवीनचंद्र किल्लेकर, दीपक कदम, मयूर फटकुरे, शाखाप्रमुख महेंद्र काणेकर, आदर्श कदम आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
