खेड (मंदार आपटे) : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड (रत्नागिरी) या शैक्षणिक संस्थेच्या श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव उच्च माध्यमिक विभागातील 12 वी वाणिज्य शाखेतील सुशांत सुरेश काणीम, गौरी संजय सावंत, आर्यन संतोष बिजीतकर, रिया प्रकाश विचारे या विद्यार्थ्यांनी सप्टेंबर 2026 मध्ये झालेल्या C. A. Foundation परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल या चारही विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
इयत्ता 11 वी पासूनच सुरु केलेल्या C.A. Foundation परीक्षेच्या मार्गदर्शनामुळे व सराव परीक्षांमुळे हे विध्यार्थी C. A. Foundation परीक्षा पास झाले आहेत. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक डॉ. चंद्रसेन घुंबरे, संजय पाटील, मारुती आडाव, विठ्ठल सकुंडे, अतुल आगलावे, कांतिनाथ शिंदे, यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्याच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले व पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
ज्ञानदीप भडगावचे चार विद्यार्थी C. A. Foundation परीक्षा उत्तीर्ण…
