गुहागर : इंस्टाग्रामच्या माध्यमातून 2025 पासून ओळख झालेल्या व नंतर जवळ घेऊन शारीरिक संबंध ठेवल्याने अल्पवयीन मुलीने मुंबई येथील एका खाजगी रुग्णालयात बाळाला जन्म दिला आहे. याप्रकरणी गुहागर तालुक्यातील 29 वर्षीय तरुणावर पोक्सो व ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुहागर तालुक्यातील रानवी येथील 29 वर्षीय समीर कांबळे या तरुणाला बुधवारी मध्यरात्री अटक करण्यात आले आहे. इंस्टाग्राम मधून डिसेंबर 2025 मध्ये या दोघांची ओळख झाली. त्यानंतर 2026 मध्ये गुहागर बीचवर भेटीगाठी वाढल्या आणि यामध्येच शारीरिक संबंध निर्माण झाले. त्या मुलीने मुंबई येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये बाळाला जन्म दिला आहे. या घटनेनंतर संबंधित तरुणाचा शोध घेतल्यावर रानवी येथील या 29 वर्षीय तरुणावर पोक्सो व ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय अधिकारी शैलेश सनस करत आहेत.