रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते माननीय अशोकभाई कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री. राजूभाई जाधव, जिल्हा मजूर संघाचे माजी अध्यक्ष श्री. राकेशशेठ जाधव, रत्नागिरी जिल्हा मजूर सहकारी बँकेचे माजी सहाय्यक सरव्यवस्थापक श्री. संतोष जाधव, अल्पसंख्याक जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. खालिदभाई पटाईत तसेच सिव्हिल इंजिनिअर श्री. पंकज जाधव उपस्थित होते.

सर्व मान्यवरांनी अशोकभाई कदम यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.