मंडणगड : तिडे येथील ग्राममहसूल अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सिद्धी भोईर यांची कोकण भवन येथील विभागीय आयुक्त कार्यालयात बदली झाल्याने त्यांच्या या नव्या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा महामंत्री अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी देव्हारे ग्राम महसूल अधिकारी अमोल पाटील,पालवणी ग्राम महसूल अधिकारी रतन साळुंखे, पाचरळ ग्राम महसूल अधिकारी रमेश बर्दापुरे उपस्थित होते.
तिडेच्या ग्राममहसूल अधिकारी सिद्धी भोईर यांची कोकण भवन येथे बदली; अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक शुभेच्छा!
