चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग मित्र आणि डाऊ केमिकल्सच्या वतीने ‘माझा शाश्वत कोपरा’ या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा निगडे बोरज नंबर २ येथे चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी वयोगटानुसार सहभाग घेतला होता. १ ते ५ वयोगटात श्रिया आदावडेने प्रथम, मधुरा शिगवणने द्वितीय, तर आराध्या मोरेने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच ६ ते ७ वयोगटात तनवी कांबळे प्रथम, यश चीनकटे द्वितीय आणि रुणाल मोरे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र बेलोसे, शिक्षिका स्वाती राठोड, श्री. कासार आणि श्रीमती कासार उपस्थित होत्या. निसर्ग संवर्धन आणि कलेची जोपासना करण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेचे पालकांनी मोठे कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून शाळेतील सर्व शिक्षकांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
