आगरवायंगणी : दापोली एज्युकेशन सोसायटी, दापोली संचलित श्रीराम हायस्कूल, पाज-पंढरीमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयात शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन घुले, शिक्षिका मीनाक्षी नागदिवे, शिक्षक राजेश महाडिक, दिगंबर पावसे, पडवेकर, ओंकार बेडेकर उपस्थित होते. प्रथम लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक अर्जुन घुले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.
सदर वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता आठवी गटात कु. सुरज सुरेश चाफे, कु. अर्शीका सुरेश चोगले आणि कु. रक्षक गणेश पावसे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले. तर नववी ते दहावी गटात प्रथम क्रमांक -कु. निष्का कृष्णा चोगले, द्वितीय क्रमांक- कु. वीरश्री हरेश्वर दोरकुळकर आणि तृतीय क्रमांक- कु. ध्रुवी जयदास काळपाटील यांनी सुयश संपादन केले.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून शिक्षिका मीनाक्षी नागदिवे शिक्षक ओंकार बेडेकर यांनी काम पाहिले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक दिगंबर पावसे तर आभार शिक्षक राजेश महाडिक यांनी मानले.