मुंबई : सिद्धिविनायक ट्रस्टवर १८ कोटींच्या अपहाराचा आरोप; सदा सरवणकरांचा खुलासा;
- हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायक मंदिराची कोणी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे का, अशी शंका नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.
- कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी जे पत्र वाचून दाखवले, त्याबाबत आम्ही सखोल चर्चा करणार आहोत.
- सर्व भाविक श्रद्धा आणि भक्तिभावाने मंदिरात येतात. त्यामुळे देवस्थानाची बदनामी होऊ नये, ही सर्वांची भावना आहे.
- काही दिवसांपूर्वी काही कर्मचाऱ्यांकडून चोरीची घटना घडली होती. मात्र ती उघडकीस आणण्यात आम्हाला यश आले.
- या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाचे (ACB) नांगरे पाटील यांचे सहकार्य लाभले आणि चोरी उघडकीस आणणे शक्य झाले.
- आम्ही केवळ पत्रच नव्हे, तर संपूर्ण माहिती संबंधित यंत्रणांना देणार आहोत.
- सिद्धिविनायक न्यासामध्ये काहीतरी गैरप्रकार सुरू असल्याचा आम्हाला संशय आहे.
- मंदिरात येणाऱ्या निधीमध्येही काही गडबड होत असल्याची शंका आहे.
- त्यानंतर आम्ही ट्रस्टी भास्कर शेट्टी यांची भेट घेतली.
- ज्या दिवशी दानपेटीतील रकमेची मोजणी केली जाते, त्या दिवशी सर्व प्रवेशद्वारे बंद करून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. नवीन कर्मचारी आल्यानंतर चोरी करणारे कोण आहेत, हे समोर आले.
- राजन पेंडुरकर नावाच्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली. त्याला मदत करणाऱ्या आणखी आठ कर्मचाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
- संबंधित आरोपी नऊ दिवस न्यायालयीन कोठडीत होते.
- विशाखा राऊत यांनी त्यांना नोकरीवर ठेवले होते. ते त्यांच्या परिचयातील होते.
- बहुतांश कर्मचारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ओळखीने नियुक्त झाल्याचा आरोप आहे.
- पुजाऱ्यांना दिलेली दक्षिणा नियमानुसार पुन्हा दानपेटीत जमा केली जाते.
- राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात विश्वस्तांचा कुठेही उल्लेख केला नाही. संबंधित प्रकरणातील विश्वस्त हे आधीचे होते. तसेच अनेक कर्मचारीही तत्कालीन व्यवस्थेशी संबंधित होते.
- सुरुवातीला FIR मध्ये एका व्यक्तीचेच नाव होते. त्यानंतर पोलिसांनी तपास करून इतर आरोपींनाही अटक केली.
- GPay द्वारे पैसे घेऊन दर्शन घडवणाऱ्या १९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
- दर्शनासाठी पैसे घेणाऱ्या स्टॉलधारकांवरही कारवाई करण्यात आली आहे.
- विश्वस्तांनी तक्रार दिल्यानंतर एकूण ४६ जणांवर कारवाई झाली असून, त्यापैकी ९ जणांना निलंबित करण्यात आले आहे.
- या घटनेनंतरही भाविकांची संख्या वाढली आहे.
- वरिष्ठ नेत्यांनी एवढेच सांगितले की, मंदिराचा कारभार पूर्णपणे पारदर्शक आणि स्वच्छ राहिला पाहिजे.
- ऑडिटनंतर आम्ही ३० सुरक्षा कर्मचाऱ्यांची बैठक घेतली आणि मंदिरात भ्रष्टाचार अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट केले.
- यावर्षी गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी ३६ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. यापूर्वी ही रक्कम २० कोटी रुपये होती.
- २०२२-२३ मध्ये ही मदत केवळ ६ कोटी रुपये होती. आम्ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर ती १४ कोटींवर गेली आणि आता ३६ कोटींवर पोहोचली आहे.
- संबंधित पत्र देण्यात आले, त्या दिवशी मी दिल्लीत होतो.
- सुरुवातीला आम्हाला केवळ १० हजार रुपयांच्या चोरीची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर प्रत्येक आरोपीकडून १० हजार रुपये घेऊन एकूण ८० हजार रुपये परत मिळवण्यात आले. मात्र आम्ही त्यावर थांबलो नाही. जेवढी चोरी झाली आहे, ती संपूर्ण रक्कम परत मिळाली पाहिजे. त्यासाठी पोलिस आणि CBI चौकशीची मागणी केली आहे.
