चिपळूण : महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघाच्या रत्नागिरी जिल्हा शाखेची सभा काल शुक्रवार दि. 31 रोजी चिपळूण पंचायत समिती जवळील माता रमाबाई सभागृहात उत्साहात पार पडली. यावेळी रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष नितीन बेलोसे आणि जिल्हा सचिव आशिष घोसाळकर यांनी चिपळूण तालुका कार्यकारिणीची घोषणा केली.
नवीन कार्यकारिणीत दिलावर खडपोलकर (शिरळ) यांची चिपळूण तालुका अध्यक्षपदी, तर सुहास मोहिते यांची तालुका सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सभेला संगमेश्वर तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, देवरुख तालुका अध्यक्ष संजय टक्के, खेड तालुका अध्यक्ष आंब्रे, मंडणगड तालुका अध्यक्ष दत्तात्रय भोसले, चिपळूणचे माजी तालुका अध्यक्ष अनंत चिकलकर, तसेच बाळकृष्ण कदम, दीपाली भाबल, दीपक रावणंग, विशाल महाडिक, अजय वाजे, चंद्रकांत शिगवण, संदीप शिर्के, रणजित जाधव आणि कान्हेचे पोलीस पाटील शैलेश जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस पाटील उपस्थित होते.
चिपळूण तालुका पोलीस पाटील संघाच्या अध्यक्षपदी दिलावर खडपोलकर, सचिवपदी सुहास मोहिते
