चिपळूण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी मंत्री तथा आमदार भास्कर जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार, दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शिरळ येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शिरळचे सरपंच शशिकांत राऊत यांच्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या महाआरोग्य शिबिरामध्ये विविध आजारांची तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन तसेच आवश्यक आरोग्य सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शिबिरासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी, विविध शासकीय व निमशासकीय विभागांतील अधिकारी-कर्मचारी, गावातील ग्रामस्थ तसेच विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना (उबाठा)चे माजी सरपंच तथा उपविभाग प्रमुख फैयाज शिरळकर यांनी केले आहे.