सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग नगरीमध्ये १९९९ पासून वास्तव्यास असलेल्या रहिवाशांच्या भूखंड आणि घरांच्या मालकी हक्काचा प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या म्हणण्यानुसार, रहिवाशांच्या नावावर आता ७/१२ उतारे लागण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, या कामापैकी सुमारे १० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित प्रक्रिया वेगाने पूर्ण करून सर्व १८ नागरी सुविधा उपलब्ध करण्यासह सिंधुदुर्ग नगरीला नगरपंचायतीचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रशासन काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग नगरीतील रहिवाशांना मालकी हक्काचा दिलासा; ७/१२ उताऱ्यांची प्रक्रिया सुरू, नगरपंचायतीच्या दिशेने पाऊल…
