रायगड ( मनोज खांबे ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) यंदाचा पक्ष वर्धापनदिन सोहळा ऐतिहासिक किल्ले रायगडच्या पायथ्याशी साजरा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासाठी पक्षाकडून हालचालींना वेग आला असून प्राथमिक स्तरावर जागेची पाहणी करण्यात आली आहे.
मनसे नेते अविनाश जाधव आणि संदिप देशपांडे यांनी रायगड पायथ्याशी उपलब्ध जागेची पाहणी करून कार्यक्रमाच्या दृष्टीने सोयी-सुविधांचा आढावा घेतला. कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेता वाहतूक, पार्किंग, सुरक्षा व निवास व्यवस्थेचा अभ्यास करण्यात आला.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसेचा वर्धापन दिन ८ आणि ९ मार्च रोजी किल्ले रायगडच्या पायथ्याशी होईल अशी अपेक्षा आहे. ऐतिहासिक रायगडावरून पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत महत्त्वपूर्ण संदेश दिला जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
रायगडाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे या ठिकाणी वर्धापनदिन सोहळा झाल्यास त्याला विशेष राजकीय व प्रतीकात्मक महत्त्व प्राप्त होणार आहे. अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
या पहाणी दरम्यान उत्तर रायगडचे जिल्हाध्यक्ष जीतू पाटील, , रायगड संपर्क प्रमुख दिलिप सांगळे, रायगड उपाध्यक्ष चेतन उतेकर, सचिव अमोल पेणकर, पनवेल शहरध्यक्ष योगेश चिले,
मनसे विद्यार्थीसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रतिक रहाटे, महाड शहरध्यक्ष पंकज उमासरे हे मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
