चिपळूण: शहरातील बहादूर शेख येथे हायवे लगत असलेल्या मुतप्पन मंदिर कमानी जवळ अरुंद रस्त्यामुळे होत असलेल्या अपघातांची शृंखला चालूच असून काल सायंकाळी ७.३० च्या सुमारास पुन्हा एकदा त्याच ठिकाणी एक मोटरसायकल स्वार नाल्यात कोसळला.त्याला जेसीबीने बाहेर काढण्यात आले.सुदैवाने जीव वाचला.पण इथल्या सर्व्हिस रोडच्या विचित्र आकारामुळे हा भाग अपघात प्रवण झाला आहे.रस्ता मधेच वाकडा करण्यात आला असल्याने हे अपघात होत आहेत असं स्थानिक जनतेचे म्हणणे आहे. या भागात होत असलेल्या अपघातांबाबत ज्येष्ठ पत्रकार सुहास बारटक्के आणि समाजसेवक प्रकाश पवार हे वारंवार लक्ष वेधत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
