खोपोली ( जयवंत माडपे ): महाराष्ट्राचे थोर संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या तुकाराम बीज शतकपूर्ती सोहळा महाराष्ट्रात सर्वत्र भक्ती भावाने साजरा होत असताना ,खोपोली नजीक साजगाव येथील धाकटी पंढरी म्हणून नावाजलेल्या विठू माऊली मंदिरात यानिमित्ताने 26 फेब्रुवारी ते 7 मार्च या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याला खालापूर तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील हजारो भाविकांनी या सोहळ्यात उपस्थिती दर्शविली. यानिमित्ताने या कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकारांच्या कीर्तन व प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते याt ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा समावेश आहे
6 फेब्रुवारी रोजी दीपोत्सव कार्यक्रमाला खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे उपनगराध्यक्ष विक्रम साबळे या विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. धाकटी पंढरीचे हभप तानाजी महाराज कर्णूक, व ह भ प भाई महाराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली व स्थानिक कार्यकारी कमिटी अध्यक्ष अनंत पाटील व त्यांच्या सहकार्यांच्या अथक प्रयत्नामुळे हा सोहळा नेत्रदीपक ठरला. रिंगण सोहळा पायी, दिंडी सोहळा या कार्यक्रमाने तर प्रति पंढरपूरचे स्वरूप पहावयास मिळाले या सोहळ्यामध्ये असंख्य भाविकांनी टाळ मृदुंगाच्या स्वरात दिंडी सोहळ्यामध्ये भाग घेतला. ज्ञानोबा तुकाराम या अभंगाणे परिसर भक्तीमय झाला होता. खालापूर रायगड जिल्ह्यातील भाविकांनी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात धाकटी पंढरीचे सोहळ्याचे आयोजन केल्याचे उपस्थित वारकऱ्यांनी व ग्रामस्थांनी सांगितले. गेले दहा दिवस या परिसराला तर प्रति पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाले होते.