खेड :- शहराजवळील भडगांव- खोंडे गावामध्ये तिथीप्रमाणे एक गांव एक जयंती पध्दतीने शिवजयंती उत्सव शुक्रवार दि. ६ मार्च २०२६ रोजी ग्रामस्थ मंडळ खोंडे, तमाम शिवप्रेमी व आदर्श शाळा भडगांव- खोंडे यांच्या सह‌कार्याने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी दिवा मुंबई येथील श्री ब्रह्मनाद ढोलताशा पथक व ओम साईराम बॅन्जो पथक हि भाविकांची विशेष आकर्षणे ठरली.तसेच सांगली येथील हिंदुरत्न शिवव्याख्याते यांच्या शिवव्याख्यानाने सर्वचजण कमालीचे प्रभावित झाले.
दि. ६ मार्च रोजी पहाटे ५ वाजता रसाळगड येथुन सकाळी ९ वाजता भरणे येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ शिवज्योतचे आगमन झाले. सकाळी ९:३० ते १० – भरणे येथे शिवछत्रपती महाराजांच्या स्मारकाचे पूजन करण्यात आले. सकाळी १० वाजता शिवज्योतचे भरणे येथून सकाळी ११ वाजता खोंडे येथे आगमन झाले, त्यानंतर सकाळी ११ ते १२ या वेळेत शिवज्योत व महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाले. सायंकाळी ४ ते ६ यावेळेत वेशभूषा प्रदर्शन झाल्यानंतर पालखी मिरवणूकीचा दिमाखदार व डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा पार पडला. सायंकाळी ७:३० ते ९:३० स्नेहभोजन झाल्यानंतर रात्री ९:३० ते ११ यावेळेत हिंदुरत्न शिवव्याख्याने प्रशांत ऊर्फ अतुल पतंगराव पाटील यांच्या शिवव्याख्यानाने कार्यक्रमाची उत्साही व यशस्वी सांगता झाली.