देवरुख (प्रतिनिधी ) : केअर हेल्थ विमा कपंनी कडून देवरुख येथील सौ ज्योती सुरेश सप्रे यांचा सर्वोत्तम कामगिरीबद्दल दुबई येथील कार्यक्रमात कपंनीचे वरिष्ठ अधिकारी जगदेव सिंग चौहान व गौरव बेंद्रे. रुची जागुष्टे यांचे हस्ते सत्कार करणेत आला.
केअर हेल्थ कपंनीतर्फे आरोग्य विमाच्या विविध योजना राबविण्यात येतात त्याचा फायदा आजारपणात रुग्णाना खर्चातुन दिलासा मिळावा म्हणून योजना जन सामान्यापर्यंत पोहचविण्याचे
विशेषकार्य ज्योती सप्रे यांनी केले. या कार्याची दखल कपंनीतर्फे त्यांच्या विशेष कार्याबद्दल गौरवण्यात आले.
सदरचा कार्यक्रम दुबई येथील फेस्टिवलं सिटी येथील हॉलिडे इन येथे सपन्न झाला.
यावेळी कपंनीचे सतीश जाधव. किशोर सावंत. सनी जागुष्टे. प्रीतमसर. आदी मान्यवरसह महाराष्टतील विविध भागातील 380 जणं उपस्थित होते.
