लोटे:- खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहती मधील डॉक्टर खान केमिकल कंपनीत दिनांक ६ मार्च रोजी रिऍक्टर चा स्फोट होऊन ११ कामगार जखमी झाले होते. या प्रकरणी खेड पोलिसांकडून कारखाना मालक व्यवस्थापक प्लांट इन्चार्ज आणि अन्य एक अशा चौघांवर खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जखमी कामगारांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कारखाना व्यवस्थापन कडून देण्यात आली.
दिनांक ६ मार्च रोजी दुपारी अडीचच्या सुमारास डॉक्टर खान इंडस्ट्रियल केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात रियाक्टरचा स्फोट होऊन अकरा कामगार जखमी झाले होते. पैकी सहा कामगार सध्या ऐरोली येथील नॅशनल बर्न हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत. एक कामगार चिपळूण मधील लाईफ केअर रुग्णालयात जनरल वार्ड मध्ये तर अन्य चार जखमी कामगार लोटे घाणेखुंट येथील परशुराम रुग्णालयात जनरल वार्ड मध्ये उपचार घेत आहेत. या अपघातानंतर खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, स्थानिक महसूल अधिकारी, इंडस्ट्रियल सेफ्टी विभागाचे अधिकारी, फॉरेन्सिक टीम इत्यादी यंत्रणा कंपनीत दाखल होऊन अपघाताचा तपास करत आहेत. दरम्यान जखमी कामगारांच्या पाठीशी कारखाना व्यवस्थापन खंबीरपणे उभे आहे. त्यांच्या उपचारामध्ये कोणत्याही प्रकारची कमी पडून देणार नाही, असे कारखान्याच्या वतीने सांगण्यात आले. ऐरोली येथील सहा कामगारांपैकी तिघांवर प्लास्टिक सर्जरी झाली असून झाली असून अन्य तिघांवर उपचार चालू आहेत. असेही सांगण्यात आले. कारखान्यामध्ये सुरक्षाविषयक आवश्यक त्या यंत्रणा कार्यान्वित असून योग्य ती काळजी घेतली जाते, असे सांगण्यात आले.

चौकट
कारखान्यामध्ये फायर हायड्रंट सिस्टीम कार्यान्वित.

कारखान्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत आग विझवण्यासाठी आवश्यक असलेली फायर हायड्रंट सिस्टीम पूर्ण कार्यक्षमतेने कार्यान्वित आहे आणि दर आठवड्याला त्याची मॉडल घेतले जाते. झालेला अपघात हा दुर्दैवी असून आम्ही कामगारांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.