संगमेश्वर : बांगलादेशातून बेकायदेशीर रित्या भारतात प्रवेश केलेल्या एका महिलेला संगमेश्वर तालुक्यातील आंबेड खुर्द येथे आश्रय दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी त्या महिलेसह तिच्या पतीविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सिनेम युसूफ सय्यद उर्फ शांतना अहमद खान (मूळ रा. खिलगाव, जिल्हा गाजीपूर, ढाका, बांगलादेश) ही महिला २०१७ पासून भारतात अवैधरित्या वास्तव्य करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. संगमेश्वर तालुक्यातील आंबेड खुर्द येथील मुस्लिम मोहल्ल्यात राहणारा युसूफ महंमद सय्यद याने ती परदेशी नागरिक असल्याची माहिती असतानाही तिच्याशी विवाह करून तिला भारतात राहण्यासाठी आश्रय दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी संबंधित महिलेचे बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड तयार करण्यात आल्याचेही तपासात उघड झाले आहे. या बनावट कागदपत्रांच्या आधारे कॅनरा बँकेत खाते उघडण्यात आले असल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे. त्यामुळे भारतीय प्रशासकीय तसेच बँकिंग व्यवस्थेची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी दोघांनाही अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पुढील तपासासाठी आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संगमेश्वर पोलीस करीत आहेत.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH