नवी दिल्ली : देश म्हणून एकत्र म्हणून आपण काय करू शकतो याची चर्चा करणं अतिशय गरजेच आहे आणि त्याच्यामुळे भारत सरकारने तातडीने एक ऑल पार्टी मीटिंग ही बोलवली पाहिजे आणि त्याच्याबरोबर पार्लमेंटमध्ये ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे ही आमची मागणी आहे,असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की,भारताचे परराष्ट्र धोरण, वाणिज्य मंत्रालयाचे धोरण, सध्या निर्माण झालेली गॅस टंचाई आणि आपली ऊर्जा सुरक्षितता ही मोठी आव्हाने आज आपल्यासमोर आहेत. त्यामुळे ही राजकारण करण्याची वेळ नाही. आज भारतीय माणूस अडचणीत आहे. त्यामुळे सरकारने सर्व पक्षांना विचारात घेऊन यावर तातडीने चर्चा करावी,असे सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,आज जागतिक पातळीवर जी स्थिती उद्भवली आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर देशाच्या परराष्ट्र धोरणासंदर्भात सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, तसेच याबाबतीत संसदेमध्येही चर्चा झाली पाहिजे कारण हा देशाचा प्रश्न आहे.असे सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना सांगितले.

पुढे बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,देशाच्या परराष्ट्र धोरण आणि ऊर्जा सुरक्षिततेबाबत गेल्या अनेक दिवसांपासून राहुल गांधी जे वारंवार बोलत आहेत. ते सत्य होताना दिसतंय. आज आपण ते अनुभवत असून सामान्य माणसाला हे सर्व भोगावं लागतंय याचं दुःख आहे, असेही सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.