पेण(प्रशांत पोतदार) : पेण पोलीस ठाणे हद्दीत दोन ठिकाणावरून स्कुटी चोरीची घटना घडली होती या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पेण पोलिसांनी अगदी शिताफीने राजेंद्र नथुराम किळंजे उर्फ अबु (रा.नागोठणे) याला दोन ॲक्टीव्हा स्कुटी चोरल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

पेण पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण कक्षाने केलेल्या तपासात त्याने दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली आहे.त्याच्याकडून चोरीला गेलेल्या दोन्ही स्कुटी जप्त करण्यात आल्या आहेत.

यामध्ये एक लाल रंगाची होंडा कंपनीची ॲक्टीव्हा स्कुटी (क. एम.एच.०६/सी.बी/१०८४) अंदाजे रक्कम २० हजार तर एक निळया रंगाची टिव्हीएस कंपनीची ज्युपीटर स्कुटी (क. एम.एच.०६/सी.के/७४४२) अंदाजे २५ हजार असा जप्त गाड्यांचा समावेश आहे.

पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण कक्षातील अधिकारी आणि अंमलदारांनी ही कामगिरी बजावली आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल,पोलीस निरीक्षक संदिप बागुल यांच्या सुचना प्रमाणे गुन्हेप्रकटीकरण कक्षातील अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक निलेश राजपूत,पोलीस उपनिरीक्षक सुनिल चव्हाण,सहा.पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील,पोहावा.
प्रकाश कोकरे,अजिंक्य म्हात्रे, सचिन व्हसकोटी,सुशांत भोईर,अमोल म्हात्रे, गोविंद तलवारे,संदिप शिंगाडे यांनी तपास केले.