माणगाव : माणगाव तालुक्यातील वारक गावातील कु. वैष्णवी संतोष पांचाळ हिची महाराष्ट्र सुरक्षा बल मध्ये निवड झाल्याबद्दल भाजप महिला मोर्चा तर्फे सत्कार करण्यात आला.
अत्यंत हलाखीच्या व गरिबीच्या परिस्थितीतून जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे. तिच्या या कर्तृत्वामुळे वारक गावासह संपूर्ण माणगाव तालुक्याचे नाव उज्ज्वल झाले असून ही आपल्या तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे.
महाराष्ट्र सुरक्षा बल हे राज्यातील विविध सरकारी कार्यालये, महत्त्वाची ठिकाणे, प्रकल्प आणि सार्वजनिक स्थळांच्या सुरक्षेसाठी कार्य करणारे बल असून राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावते.
यावेळी भाजप महिला मोर्चा माणगाव तालुका अध्यक्षा रचना निलेश थोरे, जिल्हा उपाध्यक्षा रुपाली कासारे तसेच भाजपा माणगांव तालुकाध्यक्ष परेश सांगले, समीर शिंदे ग्रामस्थ व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैष्णवीचे हे यश अनेक तरुण-तरुणींना प्रेरणा देणारे असून तिच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.