खेड : – सन २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा साखरोली मोरेवाडी शाळेतील कु. प्रणय प्रशांत कांबळे याची निवड झाली आहे. अतिशय दुर्गम ग्रामीण भागातील हा विद्यार्थी असून सर्वसामान्य कुडूंबातील आहे.
या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक अनिल यादव यांच्यासह मार्गदर्शक सहशिक्षक राजेश भागणे, कृष्णा गंभीरे व अमोल सकपाळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या त्यांच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश मोरे व सदस्य, ग्रामस्थ, पालक यांच्यकडून कु. प्रणयचे अभिनंदन करण्यात येऊन पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
साखरोली मोरेवाडी शाळेच्या प्रणय कांबळे याची जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत निवड !
