चिपळूण : चिपळूण तालुकाध्यक्ष माननीय महादेव चव्हाण साहेब यांच्या सौजन्याने कामथे येथील रुग्णालयात सर्व रुग्णांना केळी,सफरचंद,डाळिंब,संत्री,मोसंबी फळांचे वाटप करण्यात आले. याकरीता महादेव चव्हाण चिपळूण काँग्रेस तालुकाध्यक्ष.तुळशीराम पवार जिल्हाध्यक्ष सेवादल. रफीक मोडक जिल्हा सरचिटणीस,संजय जाधव जिल्हा सरचिटणीस,दादा आखाडे सल्लागार. सुनिल खेडेकर चिपळूण काँग्रेस जेष्ठ नेते.

अजीत शिन्दे चिपळूण शहराध्यक्ष अरुण म.कदम वहाळ विभाग काँग्रेस अध्यक्ष,सुधीर जाधव सावर्डे विभाग काँग्रेस अध्यक्ष. चंद्रकांत सावंत काँग्रेस सदस्य. प्रशांत गमरे पत्रकार. प्रदीप गमरे. डाॅ. सकपाळ सर. डाॅ. सानप सर व रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांचा वाढदिवस एका वेगळ्या उपक्रमाने साजरा केला गेला. सकपाळ साहेब यांना दीर्घायुष्य लाभो. अशी दुवा रुग्णांकडून मिळावी या हेतूने तालुकाध्यक्ष महादेव चव्हाण साहेब यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळेस रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते..