खेड :- येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचालित ज्ञानदीप इंग्लिश मिडियम स्कूल (CBSE), मोरवंडे-बोरजचे प्राचार्य श्री. भरत मोरे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘पर्यटन मित्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रत्नागिरी पर्यटन सेवा संस्था मर्यादित यांचेकडून जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून पर्यटन व पर्यावरण या क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पर्यटन मित्र पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार उद्योगमंत्री ना. उदयजी सामंत यांच्या शुभहस्ते देण्यात आला .
त्यांच्या कार्याची दखल घेत मिळालेला हा सन्मान ज्ञानदीप इंग्लिश मिडियम स्कूल तसेच संपूर्ण ज्ञानदीप परिवारासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असताना सामाजिक व पर्यटनविषयक उपक्रमांना प्रोत्साहन देत त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या सन्मानामुळे प्रशालेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. प्राचार्य श्री. भरत मोरे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.