खोपोली (जयवंत माडपे ) : मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज सकाळी एका कंटेनरने समोरील पाच वाहनांना जोरदार धडक देऊन भीषण अपघात झाला असून या अपघातात इनोव्हा कार मधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर टाटा टिगारो कार मधील चार जण जण जखमी झाले आहेत या अपघातात कंटेनरने समोरील पाच वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहेत यात तीन कार एक आयसर टेम्पो आणि एक बलकर असा सहा वाहनांचा समावेश आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून कंटेनर क्रमांक( MH 43 CE 3289) हा चालक अवधेश यादव (वय 37 रा सारजा अझमगड उत्तर प्रदेश )हा आपल्या ताब्यातील कंटेनर घेऊन पुण्याहून मुंबई कडे जात असताना तो बोरघाटातील खोपोली एक्सिट जवळील आला असता चालकाचे कंटेनर वरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील टाटा पंच कार क्रमांक( MH 14 MF 4185) ला जोरदार ठोकर मारून तिच्या पुढे असलेल्या टाटा टीगारो कार क्रमांक (MH 12 WE) हिला जोरदार धडक दिली, तर टाटा टीगारो कारच्या पुढे असलेल्या असलेल्या आयसर टेम्पो क्रमांक( MH 14 LE 9533) याला जोरदार धडक देऊन कंटेनर पुढे जाऊन इनोव्हा कार क्रमांक (MH 12 VV 7023) हिला पाठीमागून जोरदार धडक देऊन इनोव्हा कारवर कंटेनर पलटी झाला, तर पुढे असलेल्या बलकर क्रमांक( MH 43 CE 9804 ) ला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे,
या अपघातात इनोव्ह कार मधील श्रीकांत अनंत जाधव( वय 63 रा गिरीजा शंकर विहार पुणे,) अंबादास दामू पेटारे( वय सिहंगड रोड हिंगणे पुणे,) प्रमोद संतोष पवार या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर टाटा टिगारो कार मधील स्वप्नील नामदेव भुजबळ, नवनाथ भुजबळ, अक्षय गायकवाड, भानुदास गायकवाड, आणि कंटेनर चालक अवधेश यादव हे जखमी झाले आहेत, तर या अपघातातील सहा वाहनांचा चक्काचूर झाला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग, अपघातग्रस्त टीमचे सदस्य,डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, मृत्युजय टीम आदी तात्काळ घटनास्थळी दाखल होत कार मध्ये अडकलेल्या प्रवाशांना तात्काळ बाहेर काढून पुढील उपचारासाठी खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले तर तीन जणांचे मृतदेह खालापूर येथे शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत, तर सगळी वाहने क्रेनच्या साहाय्याने बाजूला घेऊन एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी चालू करण्यात आला आहे .
एक्सप्रेस वेवर सहा वाहनांचा भीषण अपघात तीन जणांचा जागीच मृत्यू…
