चिपळूण : उन्हाळ्यात पाण्याची गरज सर्वाधिक भासते. अशावेळी सर्वसामान्यांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देणे ही अत्यंत महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे. नगरसेवक संदीप भिसे यांनी घेतलेला हा पुढाकार अनुकरणीय असून, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचविण्याचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे समाजात सेवा, सहकार्य आणि आपुलकीची भावना अधिक दृढ होते. पाणपोईसारख्या छोट्या वाटणाऱ्या उपक्रमातूनही मोठा सामाजिक संदेश दिला जातो.
आगामी काळातही ते याच सामाजिक बांधिलकीतून काम करत राहतील, असा विश्वास दक्षिण रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी व्यक्त केला.
चिपळूण नगरपरिषदेतील नगरसेवक संदीप भिसे यांच्या संकल्पनेतून शहरातील काविळतळी येथे सुरू करण्यात आलेल्या पाणपोईचे उद्घाटन नुकतेच झाले.
यावेळी ते बोलत होते. नागरिकांच्या सेवेसाठी सुरू केलेल्या या पाणपोईबद्दल प्रशांत यादव यांनी नगरसेवक संदीप भिसे यांचे कौतुक केले.
यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष शशिकांत मोदी, चिपळूणच्या उपनगराध्यक्षा रूपाली दांडेकर, भाजपाच्या शहराध्यक्षा रसिका देवळेकर, नगरसेविका वैशाली निमकर, नगरसेविका हर्षाली पवार, अर्बन बँक संचालक रत्नदीप देवळेकर, अभिनव भुरण, सपना भिसे, कुणाल आंबेकर, शक्तीकुमार चव्हाण, प्रवीण भिसे, सचिन शिंदे, अमोल भिसे, वेद सुर्वे, यश खंडजोडे, सुरेश भिसे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
