खेड : तालुक्यातील धामणंद पंधरागाव विभागातील वावे गावची ग्रामदेवता श्रीचंडिकामाता देवीचा यात्रा महोत्सव शनिवार दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी साजरा करण्यात येणार आहे.
सकाळी १० वाजता लाट चे पूजन करून लाट पाडणार आहेत. दुपारी महाप्रसाद होऊन ३ वाजता, लाटेची मिरवणूक काढून लाट मंदिरात आणण्यात येईल,सायंकाळी ६ वाजता लाट / बगाड खरखांबा वर स्थापण करण्यात येणार आहे. रात्री ९ वाजता १५ गावातील निमंत्रित पालख्यांचे यात्रेकरिता आगमन होईल. रात्री १०:३० वाजता ढोल ताश्याच्या गजरात व सनईच्या सुरात आलेल्या पालख्यासहित ग्रामदेवीची पालखी मंदिराच्या सभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी पालख्या नाचत गाजत छबिना काढण्यात येईल.त्यानंतर रात्री १२ वाजता पारंपरिक रितीप्रमाणे लोकनाट्य तमाशा होईल.श्रीचंडिका मातेच्या भाविक भक्तांनी परिवार व मित्र मंडळीसह बहुसंख्येने उपस्थित राहून यात्रेत सहभागी व्हावे.असे आवाहन वावे तर्फ खेड ग्रामस्थ,श्रीचंडिका माता देवस्थान कमिटी आणि श्रीचंडिका माता विकास मंडळ मुंबई,पुणेच्या वतीने करण्यात आले आहे.