मंडणगड : हनुमान जयंती उत्सवानिमित्त जय हनुमान प्रासादिक भजन, नाट्य व महिला मंडळ, वेरळतर्फे नातू यांच्या वतीने 1 व 2 एप्रिल 2026 रोजी वेरळ येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमास गृहराज्यमंत्री योगेश कदम, जि.प. अध्यक्षा अस्मिता केंद्रे, जि.प. सदस्य प्रताप घोसाळकर, सभापती प्रणाली चिले, उपसभापती दीपक मालुसरे, पंचायत समिती सदस्या दिप्ती घडशी व अनिल रटाटे यांची उपस्थिती लाभणार आहे.

बुधवार, 1 एप्रिल रोजी सकाळी 7.00 वाजता जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ, वेरळ यांचे ह.भ.प. शिवराम शिंदे व बाळाराम पिंपळकर यांचे भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी 9.00 वाजता स्वागत समारंभ व गुणवंत विद्यार्थी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रात्री 10.00 वाजता गौरव पांचाळ, संगमेश्वर विरुद्ध व्यंकटेश नर, देवगड यांच्या भजनाचा डबल बारी सामना आयोजित करण्यात आला आहे. 2 एप्रिल 2026 रोजी भजन, काकड आरती, जन्मकाळ, सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समिती अध्यक्ष विलास पिंपळकर, गणपत पिंपळकर, बाळाराम जाधव, महादेव साळेकर, अनिल तांबुटकर, गजानन चव्हाण, रामदास शिंदे, प्रसाद कात्रे, दिनेश पिंपळकर, निशांत महाजन व ग्रामस्थ मेहनत घेत आहेत.