खेड : तालुक्यातील भोस्ते घाटात अपघातग्रस्त झालेला केमिकल टँकर अखेर पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास तज्ञांच्या मदतीने सुरक्षितरीत्या हटवण्यात प्रशासनाला यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच अपघातग्रस्त टँकरमधील केमिकल दुसऱ्या रिकाम्या टँकरमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. त्यानंतर तांत्रिक पथकाच्या सहाय्याने टँकर हटवण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. हा टँकर लोटे येथील बहुचर्चित ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ कंपनीचा असून, परदेशात निर्यात होणारे केमिकल घेऊन जात असताना अपघात झाला होता. अपघातानंतर इथाईल ऍसिटेट या केमिकलची काही प्रमाणात गळती झाल्याने प्रशासन सतर्क झाले होते.
दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव मध्यरात्री काही तास घाटातील एक लेन पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. पोलिस आणि अग्निशामक दलाने रात्रभर घटनास्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संभाव्य धोका टळल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.खेड : – तालुक्यातील भोस्ते घाटात अपघातग्रस्त झालेला केमिकल टँकर अखेर पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास तज्ञांच्या मदतीने सुरक्षितरीत्या हटवण्यात प्रशासनाला यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच अपघातग्रस्त टँकरमधील केमिकल दुसऱ्या रिकाम्या टँकरमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. त्यानंतर तांत्रिक पथकाच्या सहाय्याने टँकर हटवण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. हा टँकर लोटे येथील बहुचर्चित ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ कंपनीचा असून, परदेशात निर्यात होणारे केमिकल घेऊन जात असताना अपघात झाला होता. अपघातानंतर इथाईल ऍसिटेट या केमिकलची काही प्रमाणात गळती झाल्याने प्रशासन सतर्क झाले होते.
दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव मध्यरात्री काही तास घाटातील एक लेन पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. पोलिस आणि अग्निशामक दलाने रात्रभर घटनास्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संभाव्य धोका टळल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.