चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील पूरग्रस्तांच्या पुनर्वसित गावासाठी अखेर दिलासा देणारा निर्णय झाला आहे. या गावातील रस्ते व गटार बांधकामासारख्या अत्यावश्यक नागरी सुविधांसाठी तब्बल ४६.९१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयामागे कार्यसम्राट आमदार शेखर निकम यांचा सातत्यपूर्ण आणि ठाम पाठपुरावा निर्णायक ठरला. पूरग्रस्त नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी वारंवार मंत्रीमहोदय व शासनदरबारी पाठपुरावा करत हा निधी मिळवून दिला.

तिवरे दुर्घटनेनंतर पुनर्वसित झालेल्या कुटुंबांना केवळ घर नव्हे, तर मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी आमदार निकम यांनी विशेष लक्ष दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे आता या गावात रस्ते व गटार बांधकाम होऊन नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुसह्य होणार आहे.

या निधी मंजुरीबद्दल आमदार निकम यांनी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मॅडम, मा. उद्योग व पालकमंत्री उदय सामंत साहेब तसेच मा. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील (आबा) साहेब यांचे विशेष आभार व्यक्त केले.

याचवेळी त्यांनी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार साहेब यांची आठवण काढत त्यांना त्रिवार अभिवादन केले.

हा निर्णय म्हणजे केवळ निधी मंजुरी नाही, तर जनतेच्या वेदना समजून घेणाऱ्या नेतृत्वाचा विजय आहे. कार्यसम्राट आमदार शेखर निकम यांनी पुन्हा एकदा विकासाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास सार्थ ठरवला आहे.