पोलादपूर : शहराचे ग्रामदैवत आणि तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेचे आराध्य श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार दिनांक 30 मार्च 2026 रोजी सायंकाळी श्री काळभैरवनाथ, जोगेश्वरी व रवळनाथांच्या पालखीच्या आगमनाने सुरू झाला.
तालुक्यातील आठ गावांच्या काठ्या-ग्रामदैवतांच्या पालख्या आणि हजारोंच्या संख्येने भाविक जत्रोत्सवात सामील होतात. पोलादपूरच्या पिंपळपार मारुती मंदिरासमोर सर्व काट्या पालख्यांचे स्वागत देवस्थान कमिटी कडून करण्यात येते. कोरोना काळामध्ये लॉकडाऊन दरम्यान फक्त एक वेळा बंद झालेली पोलादपूर ची जत्रा त्यानंतर प्रत्येक वर्षी भाविकांच्या मोठ्या समुदायाच्या उपस्थितीत उत्साह व जल्लोषात साजरी होत आहे.
ग्रामीण भागातून आप-आपल्या देवतांच्या पालख्या वेगवेगळ्या दिमाखदार मिरवणुकीसह भैरवनाथ नगर आनंदनगर जत्रा स्थळी येऊ लागल्या की जत्रेची गर्दी फार मोठ्या प्रमाणात दिसून येते. गेल्या चार दिवसापासून पोलादपूर शहरांमध्ये वेगवेगळे दुकानदार जत्रेच्या ठिकाणी आप-आपली दुकाने थाटत असल्याचे दिसून आले.
पोलादपूरचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ वार्षिक जत्रोत्सवाला सुरुवात
