चिपळूण : चिपळूण अर्बन बँकेचे प्रशासकीय अधिकारी श्री. समीर जंगम यांचा सन्मान करण्यात आला.
चिपळूण अर्बन बँकेच्या कौन्सिल सभेमध्ये, नवीन इमारतीच्या बांधकामाच्या भूमिपूजनापासून उद्घाटनापर्यंत महत्त्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल प्रशासकीय अधिकारी श्री. समीर जंगम यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी चिपळूण अर्बन बँकेच्या कोअर कमिटीचे प्रमुख श्री. सुचय अण्णा रेडीज व श्री. उमेशजी काटकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी बँकेचे चेअरमन श्री. मोहनशेठ मिरगल, व्हाईस चेअरमन श्री. अजय खातू, संचालक श्री. समीर शेठ टाकळे, श्री. मिलिंदशेठ कापडी, संचालिका सौ. गौरी रेळेकर, संचालक श्री. निलेशजी भुरण, श्री. भाऊ दळी, सीए श्री. विवेक रेळेकर, श्री. प्रशांतजी शिरगावकर, श्री. रेहमान दलवाई, श्री. निहारजी गुढेकर, श्री. अविनाश केळसकर, श्री. दादा खेडेकर, श्री. समीरजी जानवलकर, सीईओ श्री. सूर्यवंशी साहेब, कर्मचारी प्रतिनिधी श्री. दिनेश रेडीज, श्रीराम देवळेकर, सीओ श्री. अरविंद भागडे साहेब आणि चिंगळे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
