चिपळूण : नवविवाहितांना ऑनलाईन दाखले (Q.Rचे दाखले) मिळत नसल्याने फार मोठी अडचण निर्माण झाली आहे. ग्रामपचंयातीमध्ये नोंद घालण्यासाठी नवविवाहित गेल्यानंतर विवाह नोंदणाची ऑनलाईन प्रक्रिया होत नाही, कारण कॅम्पुटर मध्ये कोड स्कंन नसल्यामुळे ऑनलाईन दाखले मिळत नाहीत.

विवाह होण्यापूर्वी मुलीच्या आधारकार्ड, पॅनकार्ड वरती मुलीच्या वडीलांचे नाव असते व विवाह झाल्यानंतर पतीच्या नावाची नोंद करावी लागते. याकरीता ऑनलाईन विवाह नोंद दाखला पाहिजे, ऑफलाईन दाखला चालत नाही असे कार्डवरील नावे बदलणाऱ्या संबधित अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. तरी यावर शासनाने ताबडतोब योग्य तो मार्ग काढावा अशी मागणी चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.

व ते पुढे म्हणाले की, एखाद्या मिलिटरी जवानाचे शुभविवाह झाल्यानंतर त्याला दुसऱ्या राज्याच्या नोकरीला असलेल्या कार्यालयामध्ये लग्नाची ऑनलाईन नोंद पाठवावी लागते. त्या ठिकाणी ऑफलाईन नोंद ग्राह्य धरली जात नाही व ती चालत नाही. यामुळे त्यांच्यापुढे मोठी अडचण निर्माण होत आहे.

एखाद्या नवीन जोडप्याला परदेशी नोकरीसाठी व काही कारणांसाठी जायार्य असेल तर, त्यांना विवाह झाल्याचा ऑनलाईन दाखल लागतो. आधारकार्ड व पॅनकार्ड वरचे विवाहित भगीनीचे वडीलांच्या जागी पतीचे नावाची नोंद झाली नाही तर, शासन दरबारी शासकीय कामासाठी अडथळे निर्माण होत आहेत. तरी याची नोंद शासकीय संबंधित अधिकाऱ्यांनी घेऊन याच्यावर योग्य तो मार्ग निघाला पाहिजे असेही श्री मुकादम म्हणाले.