पोलादपूर : रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक (भारतीय पोलिस सेवा) आँचल दलाल यांच्या आदेशावरून पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी वृंदाने महाड येथे चित्रपट गृहामध्ये रविवारी धुरंदर पार्ट-2 सिनेमा पाहिला.
राजकीय प्रभावाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जगतासह पोलिसांनी दिलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या माध्यमातून लढाईचे जोश पूर्ण चित्रण असलेल्या
धुरंदर पार्ट 2 या बहुचर्चित यशस्वी चित्रपटातून पोलादपूर पोलिसांनी प्रेरणा घेण्यासंदर्भात रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक भारतीय पोलीस सेवा आँचल दलाल यांनी पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, उपनिरीक्षक मंगेश मुंडे, उपनिरीक्षक सतीश पवार, सहा महिला पोलीस तसेच सुमारे 25 हून अधिक पोलीस कर्मचारी हे महाड येथील चित्रपट गृहामध्ये धुरंधर पार्ट 2 हा सिनेमा पाहण्यासाठी उपस्थित राहिले.