औंढा नागनाथ : येथील पद्मावती देवी मंदिराच्या सभागृहात महंत डॉ. पद्मनाभगिरीजी महाराज यांच्या वतीने ६ जून रोजी “डायबिटीज व रोगमुक्त, व्यसनमुक्त भारत अभियान” अंतर्गत मार्गदर्शन शिबिर व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी रिचवे कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या विविध आयुर्वेदिक उत्पादनांबाबत व उपचारपद्धतींबाबत माहिती देण्यात आली.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सीएमडी सागर शिंदे, पद्मावती देवी मठाचे मठाधिपती महंत डॉ. पद्मनाभगिरीजी महाराज, डबल डायमंड गणेश जोंधळे, सुरेखा पहाडे माई, डॉ. शशिकांत देवकर, प्रशांत विनयेते, दत्ता पडधनकर, शंकर माखणे, अशोक नेवाळे, नगरसेवक राहुल बतवार, ज्येष्ठ नेते माणिक पाटील, सुनील खंडागळे, गजानन पाटील, सुरेश शिंदे, सुधाकर कदम, विश्वनाथ चव्हाण, विजय चव्हाण यांच्यासह कंपनीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात महंत डॉ. पद्मनाभगिरीजी महाराज व सीएमडी सागर शिंदे यांनी दमा, बवासीर, कर्करोग, ब्रेन ट्यूमर, अल्सर, मधुमेह, सांधेदुखी, किडनी स्टोन, थायरॉईड, अपचन, हृदयरोग, पक्षाघात आदी विविध आजारांवर कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आयुर्वेदिक उत्पादनांबाबत माहिती दिली.

या कार्यक्रमास हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यांतील कंपनीचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अधिक मासानिमित्त पद्मावती देवी मठाचे महंत डॉ. पद्मनाभगिरीजी महाराज यांच्या वतीने धोंडे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच सुरेखा पहाडे माई यांच्या हस्ते उपस्थित महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.