मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यसभेसाठी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, युवा नेते खासदार पार्थ पवार, मंत्री इंद्रनील नाईक, माजी खासदार समीर भुजबळ, महायुतीचे मंत्री आशिष शेलार, मंत्री भरत गोगावले, आदींसह पक्षाचे आमदार उपस्थित होते.