खोपोली : रायगड जिल्ह्यातील खोपोली शहर सध्या निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याने नटले आहे. सभोवताली पसरलेल्या डोंगरांच्या उंच रांगा, त्यावर दाटलेली धुक्याची पांढरी चादर आणि आल्हाददायक पावसाळी वातावरणामुळे शनिवार-रविवारी येथे पर्यटकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे.संपूर्ण आठवडा मुंबईच्या गजबजाटात आणि गर्दीत जगणारे मुंबईकर वीकेंडला मनाला शांतता मिळवण्यासाठी या परिसराला पसंती देत आहेत. खोपोलीमध्ये पर्यटनासोबतच धार्मिक स्थळांचाही उत्तम संगम आहे. येथे प्रसिद्ध गगनगिरी आश्रम, टाकई येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, अष्टविनायकांपैकी एक असलेले महडचे वरदविनायक देवस्थान यांसारखी पवित्र ठिकाणे आहेत. तसेच निसर्गाचा थरार अनुभवण्यासाठी ‘जेनिथ’ आणि ‘आडोशी’ हे विहंगम धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहेत.मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या खोपोलीला निसर्गाची मोठी देणगी लाभली आहे. विशेष म्हणजे या सर्व पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी स्थानिक पातळीवर रिक्षा आणि खाजगी गाड्यांची उत्तम सोय उपलब्ध आहे. त्यामुळे या पावसाळ्यात खोपोलीची सफर नक्कीच एक सुवर्णसंधी ठरेल!
About The Author
Related Posts
Recent Posts
- लांजा तालुक्यात जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांमध्ये हाणामारी; परस्परविरोधी तक्रारी, तिघे जखमी…
- क्रीडा संकुलांचा अखर्चित निधी आवश्यकता असलेल्या संकुलांना पुनर्वितरित करावा;मंत्रिमंडळ मान्यतेचे प्रस्ताव तात्काळ सादर करा…
- महाविकास आघाडीच्या काळात गुन्हेगारीचा कळस, संजय राऊतांनी इतिहास तपासावा; भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी काढले वाभाडे…
- देशाचे संविधान मोदी-शाह सरकारकडून मोडीत काढण्याचे काम, संविधान वाचले तर देश वाचेल: डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…
- नगराध्यक्षांच्या उपस्थितीत शिरळ विद्याभारती शाळेत संविधान दिन साजरा..