खेड : – महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त खेड नगरपरिषदेकडून जयंती उत्सवस्थळी विशेष स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात आले. या उपक्रमाबद्दल खेड व मुंबई तालुका बौद्ध सेवा संघाच्या वतीने नगर परिषद पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
या कार्याबद्दल खेड तालुका बौद्ध सेवा संघ (मुंबई) चे अध्यक्ष दीपक हळदे तसेच मुंबई व खेड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मोतीराम जाधव, निलेश तांबे, सी. आर. कांबळे, प्रकाश जाधव, संतोष जाधव आणि अशोक जाधव यांनी नगरपरिषद पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. या उपक्रमामुळे जयंती उत्सव अधिक स्वच्छ, सुंदर आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होण्यास मदत झाल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.
