चिपळूण : भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण मध्ये शुक्रवार दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत भव्य जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे.
या वेळी श्री चव्हाण साहेब यांचे ओएसडी. संतोष साखरे हे स्वतः उपस्थित राहून जनतेची निवेदने स्वीकारणार आहेत. हा जनता दरबार कार्यक्रम शासकीय विश्रामगृह चिपळूण येथे होत असून समस्याग्रस्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जनता दरबारचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपाचे रत्नागिरी दक्षिण विभाग जिल्ह्याध्यक्ष श्री प्रशांत यादव यांनी केले आहे
चिपळूण मध्ये शुक्रवारी भाजपातर्फे जनता दरबार
