चिपळूण: येथील डिजिटल आणि प्रिंट मीडियामध्ये काम करणाऱ्या श्रमिक पत्रकारांनी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आणि व्यापक स्वरूपात विधायक कार्य करण्यासाठी एकत्र येऊन जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूण या संघटनेची स्थापना केली आहे.संघटनेच्या अध्यक्षपदी दैनिक सागरचे ज्येष्ठ पत्रकार सुनील साळवी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर कोकण एक्सप्रेसचे संपादक श्री.सतीश कदम यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

नूतन संघटनेच्या उपाध्यक्षपदी पत्रकार श्री. राजेंद्रकुमार शिंदे आणि श्री.गजेंद्र खडपे तर सचिवपदी श्री. योगेश बांडागळे, खजिनदार म्हणून श्री. संतोष पिलके तर कार्यकारिणी सदस्य म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्री.मकरंद भागवत,पत्रकार श्री.निसार शेख, श्री.दीपक शिंदे, श्री.ललेश कदम, श्री.ओंकार रेळेकर यांचा समावेश आहे .

आज सायंकाळी पत्रकारांच्या झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पत्रकार संघटनेची स्थापना आणि नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली.

नूतन अध्यक्ष श्री.सुनील साळवी यांचा संघटनेतर्फे बुके देऊन छोटेखानी सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात त्यांनी संघटनेचे आभार मानताना पत्रकारांना न्याय देतानाच सामाजिक आणि विधायक कार्यासाठी जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूण ही संघटना सदैव अग्रेसर राहील अशी ग्वाही दिली. कार्याध्यक्ष सतीश कदम यांच्यासह उपस्थित सर्व पदाधिकारी व सदस्यांनीही मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.