रत्नागिरी : जिल्ह्यातील युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवार, दि. २९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात ११ ठिकाणी ‘रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून तालुका व जिल्हास्तरावर हे रोजगार मेळावे होणार आहेत.
‘कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागा’मार्फत राज्यभर ‘रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत २९ सप्टेंबर रोजी राज्यभर एकाच दिवशी ५०० रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात येणार आहेत. या मोहिमेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
जिल्ह्यातील ११ केंद्रांवर रोजगार मेळावे
रत्नागिरी जिल्ह्यात खेड, रत्नागिरी, शिरगाव, देवरुख, लांजा, राजापूर, गुहागर, चिपळूण, मोरवंड-बोरज, दापोली आणि मंडणगड येथे रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.
खेड : शिवतेज आरोग्य सेवा संस्था संचलित बहुउद्देशीय हॉल, तळ्याचे वाकण, खेड शहर.
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, ॲड. एन. व्ही. जोशी मार्ग, जिल्हा न्यायालयाजवळ.
शिरगाव : मत्स्य महाविद्यालय, शिरगाव.
देवरुख : DeCAD – देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन, भागवत संकुल.
लांजा : कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, ताज सिटी सेंटर.
राजापूर : राजापूर हायस्कूल, राजापूर.
गुहागर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), RGTTL कंपनीजवळ, अंजनवेल.
चिपळूण : न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेर्डी-चिंचघरी (सती).
मोरवंड-बोरज : ज्ञानदीप महाविद्यालय (विज्ञान व वाणिज्य).
दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ.
मंडणगड : लोकनेते गोपीनाथजी मुंडे आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज.
ऑनलाइन नोंदणी आवश्यक
या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी. उपलब्ध QR कोडच्या माध्यमातूनही नोंदणी करता येणार आहे.
नोंदणीकृत उमेदवारांनी २९ सप्टेंबर रोजी संबंधित रोजगार मेळावा केंद्रावर प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहताना अद्ययावत बायोडाटा तसेच आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रती सोबत आणाव्यात.
जिल्ह्यातील अधिकाधिक इच्छुक युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त दत्ता चव्हाण यांनी केले आहे.