बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज सकाळीच बारामती नगरपरिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या गरुड बागेतील सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली.
यावेळी बागेतील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांची सद्यस्थिती जाणून घेतली. नागरिकांसाठी आवश्यक सुविधा, परिसराचे सुशोभीकरण तसेच विकासकामांचा दर्जा आणि कामांची गती याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. शिवाय गरुड बागेचा परिसर अधिक सुंदर, स्वच्छ आणि नागरिकांसाठी उपयुक्त होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सुनेत्रा पवार यांनी संबंधितांना सूचना दिल्या.
